खुलताबाद, (प्रतिनिधी): वेरुळ लेणी परिसरात महिला पर्यटकांचे विनापरवानगी फोटो व व्हिडिओ चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर प्रसारित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पर्यटकाविरुद्ध खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
बुधवारी (दि.२४) सकाळी उत्तर प्रदेश, पंजाब व कर्नाटकमधील काही महिला पर्यटक वेरुळ लेणी परिसरात पर्यटनाचा आनंद घेत होते. यावेळी पामेडी नागेश्वरराव सुब्बाराव (रा. सी-६९, सूपडू, गुंडूर, आंध्र प्रदेश) या पर्यटकाने संबंधित महिला पर्यटकांचे त्यांच्या परवानगीशिवाय फोटो व व्हिडिओ चित्रीकरण केले.
तसेच हे फोटो व व्हिडिओ विविध व्हॉट्सअॅप समूहांवर प्रसारित करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच संबंधित महिला पर्यटकांनी त्यास जाब विचारत जवळच असलेल्या पोलिसांना माहिती दिली. याप्रकरणी प्रतिक अनंत कुलकर्णी (रा. ११/२३, साईनगर, एन-६, सिडको, छत्रपती संभाजीनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पामेडी सुब्बाराव विरोधात खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.











